वेबसाईट ही आधुनिक समाजाला तंत्रज्ञानाकडून मिळालेली एक देणगीच आहे.
वेबसाईटचा संचार व्यक्ती आणि समाज दोघांच्या जीवनात सर्वव्यापी झालेला आहे. वेबसाईट बद्दल संपूर्ण माहिती नसली तरी सुद्धा वेबसाईट माहिती नाही असा माणूस सापडणे हा दुर्मीळ योगायोग म्हणावा लागेल. वेबसाईटनीआजशिक्षण, व्यवसाय, व्यवस्थापन, राजकारण, मिडीया, वृत्तपत्र, जाहिरात, सरकार, आरोग्य, न्याय व्यवस्था इत्यादी सर्वच क्षेत्रात आपले महत्व आणि उपयुक्तता सिद्ध केलेल आहे. आज कोणत्याही यशस्वी उद्योग-व्यवसायाचा विचार केला तर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते आणि ती म्हणजे प्रत्येक यशस्वी उद्योग-व्यवसायाने स्वत:ची वेबसाईट बनवलेली आहे. याचाच दुसरा निष्कर्ष असा तयार होतो की व्यवसाय यशस्वी होण्यासाठी वेबसाईट असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजेच व्यवसाय = वेबसाईट असे एक समीकरणच तयार होते. थोडक्यात व्यवसायात वेबसाईटला नको म्हणणे याबाबत उदाहरणा दाखल असे म्हणता येईल की संरक्षण खात्याने हवाईदलाचा विचार न करता फक्त पायद्ळच ठेवण्याचा निर्णय घेण्यासारखे आहे.
तथापी समाजातील एक फार मोठावर्ग वेबसाईट बद्दल माहीती असून सुद्धा या ना त्या कारणाने वेबसाईट बनवून घेताना दिसत नाही. त्याची कारणे स्थुलमानाने पुढे दिल्या प्रमाणे असु शकतील.
या सर्व कारणांचा वेध घेऊन टेक्नोटीका सोल्युशन्सने या आत्ता पर्यंत वेबसाईट पासून दूर राहिलेल्या वर्गाला यशस्वी व्यावसायीकांच्या प्रवाहात आणण्यासाठी ’जॉयसाईट’ नावाचे कोणत्याही विशेष संगणकीय माहिती शिवाय वेबसाईट बनविण्याचे आणि त्यात जेंव्हा जेंव्हा पाहिजे तेंव्हा तेंव्हा सहज आणि सोप्या पध्दतीने स्वहस्ते बदल करण्याचे तयार हत्यार (टुल) बनविले आहे.
आमची खात्री आहे की या टुलचा कोणत्याही व्यावसायीकाला १००% फायदाच होणार आहे. हे टुल एका भक्कम पायावर बनविले असल्या कारणाने भविष्यात त्यात सुधारित आणि नविन वेब ऍप्लिकेशन्स सहजपणे वाढविता येतील. आम्ही सुद्धा आपल्या उपयोगाची वेब ऍप्लिकेशन्स बनविण्यासाठी उत्सुक आहोत.
जॉयसाईटची स्वत:ची वेब साईट आहे त्याचा वेब ऍड्रेस www.joysite.net असा आहे आपल्याला या ठिकाणी या टुलची ट्रायल घेता तर येईलच पण आपल्या मनातील शंकांचे निरसनसुद्धा करून घेता येईल. म्हणूनच आजच आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि लवकरात लवकर यशाच्या प्रवाहात सामील व्हा. धन्यवाद !!!